|| अग्निहोत्र ||

पूर्वापर चालत आलेल्या अनेक प्रथांपैकी ही पण एक अतिशय चांगली प्रथा आपल्या पूर्वजांनी सांगितली आहे जी नित्यनेमाने केल्यास चांगले परिणाम मिळतात. घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम असते. अन्यथा निदान आठवडयातून किंवा महिन्यातून एकदा तरी करावे. अग्निहोत्रासाठी उत्तम दिशा म्हणजे वास्तूची आग्नेय दिशा.

घरातील शुद्ध व प्रदूषणरहित वातावरणासाठी अग्निहोत्र करावाच. मनःशांती, निरोगी वातावरण आणि श्रेष्ठ धान्योत्पादन तसेच उद्योगातील भरभराटीसाठी ऋषीमुनींनी अग्निहोत्राचे महत्व सांगितले आहे. उद्योजकांनी ऑफिस तसेच कारखान्यामध्ये  अग्निहोत्र नियमितपणे केल्यास वास्तू फलदायक होऊन भरभराट व्हायला वेळ लागत नाही. माझ्या काही उद्योजक मित्रांनी ह्याची प्रचीती घेतली आहे.

अग्निहोत्र विधी करण्यास स्त्री-पुरुष, जाती-प्रजाती, धर्म आणि वंशाचे बंधन नाही. कोणतेही सोवळे किंवा आहार-विहाराचे बंधन नाही. त्यासाठी काही नियम आणि विधी आहेत ज्या पाळल्या गेल्या पाहिजे.

सामुग्री :-

  • अग्निहोत्र पात्र – तांब्याचे पात्र (Pyramid shaped pot)
  • गोवंशाच्या शेण्या (Cow Dunk Cake) ( कमीतकमी १)
  • अखंड तांदूळ (दोन चिमुटभर)
  • तूप (४-६ थेंब)
  • संविधा ( ५ )
  • कापूर (५)
  • सुके खोबरे (छोटे तुकडे ५)

दररोज सूर्योदयाच्या वेळी Chant at Sunrise :-

अग्निहोत्र पात्रात गोवर्यां, संविधा, सुके खोबरे, कापूर यापासून अग्नी प्रज्वलित करावा व त्यात ४-६ थेंब तुपामध्ये दोन चिमुट अक्खे तांदूळ भिजवून पहिला मंत्र म्हणावा आणि लगेच त्यातील थोडे तांदूळ घेऊन पाहिली आहुती द्यावी.

|| सूर्याय स्वाहा सूर्याय इदं न मम ||

||Om Surya Swaha Suryay Idam Na Mama ||

 नंतर दुसरा मंत्र म्हणावा आणि उरलेले तांदूळ घेऊन दुसरी आहुती द्यावी.

|| प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम ||

||Om Prajapataye Swaha Prajapataye Idam Na Mama ||

दररोज सूर्यास्ताच्या वेळी Chant at Sunset :-

अग्निहोत्र पात्रात गोवर्यां, संविधा, सुके खोबरे, कापूर यापासून अग्नी प्रज्वलित करावा व त्यात ४-६ थेंब तुपामध्ये दोन चिमुट अक्खे तांदूळ भिजवून पहिला मंत्र म्हणावा आणि लगेच त्यातील थोडे तांदूळ घेऊन पाहिली आहुती द्यावी.

|| अग्नये स्वाहा अग्नये इदं न मम ||

|| Om Agnaya Swaha Agnaya Idam Na Mama ||

 नंतर दुसरा मंत्र म्हणावा आणि उरलेले तांदूळ घेऊन दुसरी आहुती द्यावी.

|| प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम ||

|| Om Prajapataye Swaha Prajapataye Idam Na Mama ||

वीरेश कर्णिक, कर्णिक ऍस्ट्रो वास्तू, ठाणे

फोन : ९९२०३५१५१६.

इमेल : veeresh@karnikastrovaastu.com